Latest

Ram Mandir Ayodhya : राम मंदिरातील गृर्भगृहात स्थापित मूर्तीची पहिली झलक आली समोर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राम मंदिर प्राणपतिष्ठा सोहळ्याची धामधूम अयोध्या नगरीत सुरू आहेत. मंगळवारपासून विविध धार्मिक विधींना सुरूवात झाली आहे. २२ जानेवारीला पीएम मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. दरम्यान, काल शिल्पकार अरुण योगीराज यांच्या उपस्थितीत क्रेनच्या माध्यमातून प्रभू रामच्या मूर्तीचा मंदिर परिसरात प्रवेश झाला. त्यानंतर विविध धार्मिक विधींसह मंदिराच्या गृर्भगृहात 'राम'मूर्ती स्थापित झाली. याच मूर्तीची पहिली झलक पहिल्यांदाच समोर आली आहे. (Ram Mandir Ayodhya)

म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली ५१ इंची मूर्ती काल गुरुवारी पहाटे मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर ११ वाजताच्या सुमारास ही मूर्ती स्थापित करण्यात आली. तत्पूर्वी मूर्ती स्थापित करण्याच्या ठिकाणी विविधी होमहवण देखील करण्यात आले. त्यानंतर मूर्तीची स्थापना करण्यात आली आहेत. गृर्भगृहात स्थापित राम मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली असून, २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेवेळी रामलल्लांच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात येणार असल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने म्हटले आहे. (Ram Mandir Ayodhya)

मंगळवारी १६ जानेवारीपासून विधींना प्रारंभ

मंगळवार १६ जानेवारीपासून अयोध्येत धार्मिक विधींना सुरूवात झाली आहे. १६ जानेवारी तपश्‍चर्या आणि कर्मकुटी पूजेने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात झाली. सलग सात दिवस हा विधी चालणार आहे. ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सुमारे तीन तास प्रायश्चित्त पूजा केली. यानंतर यजमानांनी शरयू नदीत स्नान केले. यानंतर मूर्ती उभारणीच्या जागेचे पूजन करण्यात आले. विष्णूची पूजा करून पंचगव्य आणि तूप अर्पण करून पंचगव्यप्राशन केले. द्वादशबद पक्षातून प्रायश्चित्त म्हणून दान केले. दशदानानंतर मूर्ती उभारण्याच्या ठिकाणी कर्मकुटी होम करण्यात आला. असा पहिल्या दिवशी विधी संपन्न झाला. त्यानंतर १७ जानेवारीला मूर्ती मंदिर परिसरात प्रवेश आणि भ्रमंती झाली. १८ जानेवारीला तीर्थपूजन, जलाधिवास आणि गंधाधिवास असे विधी पार पडले. (Ram Mandir Ayodhya)

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील उर्वरित धार्मिक विधी

२० जानेवारी – शर्कराधिवास, फलधिवास, पुष्पाधिवास
२१ जानेवारी – मध्याधिवास, सायंकाळ शैय्याधिवास
२२ जानेवारी – पीएम मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT