रायगड ; पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांना राखी बांधण्यासाठी आज महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आमदार गोगावले यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या ढालकाठी येथील शिवनेरी बंगल्यावर महिला भगिनींची तुडुंब गर्दी झाली होती. आपल्या भावाला प्रेमाचा धागा बांधण्यासाठी हजारो महिला रांग लावून उभ्या असल्याचे चित्र दिसत होते.
गोगावले यांची आपल्या मतदारसंघात गरिबांचे शेट अशी ओळख असून, गेली अनेक वर्षे त्यांच्या ढालकाठी येथील शिवनेरी या निवासस्थानी दर रक्षाबंधन सणाला शेकडो महिला भगिनी राखी बांधण्यासाठी येत असतात.
यावर्षी देखील दिवसभरात हजारो महिलांनी राखी बांधून आपल्या भवासमान आमदारांना भरभरून शुभेच्छा दिल्या. आमदार गोगावले यांनी देखील आपल्या प्रत्येक भगिनीला शुभेच्छा देत भेटवस्तू दिली. यावेळी शिवसेनेच्या वतीने सर्व महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेना कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :