Latest

Rakhi Sawant : कट्टर शत्रू बनली सख्खी मैत्रीण, राखीने शर्लिनचे केले कौतुक (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राखी सावंत जिला आपली दुश्मन समजत होती, तिचे कौतुक करत आभार मानले आहेत. राखीचा (Rakhi Sawant ) पती आदिल खान दुर्रानीसोबत सुरु असलेल्या वादामध्ये तिला शर्लिन चोप्राकडून खूप समर्थन मिळाल्याचे राखीने सांगितले. ती म्हणाली की, शर्लिनकडून मला 'हिंमत' मिळाली. राखीने हेदेखील म्हणाली की, ती शर्लिनला भेटली आणि खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्या. (Rakhi Sawant )

राखी सावंतला पॅपराझीने आपल्या मित्रांसोबत मुंबईमध्ये स्पॉट केलं. तिने शेअर केलं की, पती आदिल खान दुर्रानीसोबत सुरु असलेल्या भांडणादरम्यान तिला शर्लिन चोप्राकडून खूप समर्थन मिळाले. राखी म्हणाली, आज माझ्यासोबत जे काही घडत आहे, त्यावरून शर्लिनलादेखील वाईट वाटलं. तिने मला माझ्या कठिण समयी मला 'हिंमत' दिली. राखीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही लोक तर राखी आणि शर्लिनच्या लढाईनंतर हसत आहेत.

व्हिडिओमध्ये पॅपराझीशी बोलताना राखी म्हणताना दिसते की, 'शर्लिन चोप्राला (Sherlyn Chopra) धन्यवाद. तिने मला खूप समर्थन दिलं आहे. ती जुने वाद विसरलीय. तिने मला समजावलं. ती खूप चांगली मुलगी आहे. मी तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले होते. मला तिने समजावलं. तिचे चार शब्द मी जगण्यासाठी पुरेसे आहे. तिने मला दिलासा दिला. तू काय काय आदिल-आदिल करतेस, तुला पुन्हा जगायचे आहेत. पुन्हा परदेसिया गर्ल बनायचे आहे. तुला माझ्यासारखं स्लिम-ट्रिम व्हायचं आहे. थँक्यू शर्लिन…'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT