Latest

Rakhi Sawant : ६ वर्षांनी लहान आहे राखीचा नवा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आली आहे. राखी आदिल खानने दुर्राणीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली आहे. आदिल हा राखीचा नवा बॉयफ्रेंड आहे. पण अनेकांना हे जाणून घ्यायचे आहे की रितेशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर राखी (Rakhi Sawant)आदिलला कधी आणि कुठे भेटली?

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना राखीने आदिल आणि त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. राखी म्हणाली- मला वाटते देवाने त्याला माझ्यासाठी पाठवले आहे. रितेशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले. काहीही चांगले दिसत नव्हते. त्यावेळी आदिल माझ्या आयुष्यात आला आणि पहिल्या भेटीनंतर महिनाभरातच त्याने मला प्रपोज केले.

राखी पुढे म्हणाली- खरे सांगायचे तर मी आदिलपेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे. मी तयार नव्हते. पण मलायका अरोरा-अर्जुन कपूर आणि प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची उदाहरणे देऊन त्याने मला समजावून सांगितले. त्याने मला सांगितले की तो माझ्यावर खूप प्रेम करतो. मी पण त्यांच्या प्रेमात पडलीय.

राखी म्हणाली – आदिल हा म्हैसूरचा रहिवासी आहे. तो मला भेटायला मुंबईला येतो. तो एक व्यापारी आहे. त्याने मला म्हैसूरमध्ये बीएमडब्ल्यू कार भेट दिली. त्याने मला फोन केला होता.

राखी पुढे म्हणाली – आदिल शैलीचा भाऊ आहे. शैली माझी मैत्रीण आणि शोमधील बिझनेस पार्टनर आहे. शैलीनेच आदिलची आणि माझी ओळख करून दिली होती. त्याने माझा नंबर त्याच्या बहिणीकडून घेतला. अशा प्रकारे आमचा संवाद सुरू झाला. मी खूप गोंधळलेल्या अवस्थेत आहे.

आदिलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना राखी म्हणाली- मी टीव्ही इंडस्ट्री आणि चित्रपटांमध्ये खूप ग्लॅमरस व्यक्ती आहे. आदिलच्या कुटुंबाचा आमच्या नात्याला विरोध आहे. आमच्या नात्याविषयी कमजल्यानंतर त्याच्या घरात एकच गोंधळ उडाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT