Latest

Rakhi Sawant: तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार राखी? आदिलविषयी म्हणाली…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राखी सावंत मागील काही महिन्यांपासून आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. (Rakhi Sawant) आदिल दुर्रानीवर गंभीर आरोप केल्यानंतर आता राखी सावंत तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ड्रामा क्वीनचा पती तुरुंगात आहे. आता राखी कामावर परतली आहे. आता राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमद्ये ड्रामा क्वीन वधू वेषात दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ विरल भयानीच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतो. (Rakhi Sawant)

राखी वधू प्रमाणे सजून धजून उभी आहे. तिला पाहून राखी पुन्हा लग्न करणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या व्हिडिओमध्ये राखीने स्वत: सर्व प्रश्नांची उत्तरे देत आदिलविषयी सांगितले.

रितेशनंतर पुन्हा एकदा राखी सावंतच्या लव्ह लाईफची चर्चा होत आहे. आता राखी शूटिंगसाठी परतलीय. राखी म्हणताना दिसतेय की, ती पुन्हा लग्न करणार नाही. ती शूटिंगसाठी वधू बनलेली आहे.

व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणताना दिसते की, 'एकदा लग्न केले आहे, आता पुन्हा करणार नाही. आयुष्यात पुन्हा वधूचे कपडे परिधान करू इच्छित नाही. आता सरळ स्मशानात जाईन, पण लग्न नाही करणार.' आदिलविषयी ती म्हणाली, 'माझा एकच वर आहे, तो तुरुंगात आहे.'

SCROLL FOR NEXT