Latest

Rajya Sabha: पीयूष गोयल यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (इंडिया) या विरोधी आघाडीच्या घटकांनी आज (दि.८) राज्यसभेत सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या वक्तव्यावर पीयूष गोयल यांच्याविरोधी विशेषाधिकार भंगाची नोटीस जारी केली. या माध्यमातून राज्यसभा सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस आणि वरिष्ठ सभागृहातील काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी दिली.

जयराम रमेश यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  राज्यसभेत आज दुपारी एक वाजता, इंडिया'च्या घटक पक्षांच्या नेत्यांनी सभागृह नेते पीयूष गोयल यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव मांडला. कारण त्यांनी विरोधकांना "देशद्रोही" संबोधले.

No Confidence Motion: अध्यक्षांनी आश्वासन दिले

सभागृहनेते गोयल यांनी विरोधकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. अनेक सदस्यांनी सभापतींच्या  खूर्चीजवळ घोषणाबाजी करत गोयल यांच्या माफीची मागणी केली. सभापती जगदीप धनखर यांनी आपण या विषयावर लक्ष घालू, असे आश्वासन दिले. या गदारोळात सभागृह नेते गोयल म्हणाले की, त्यांच्या वक्तव्यात काही असंसदीय शब्द असतील तर ते काढून टाकावेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT