Latest

Raju Srivastava Health: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीरच; डॉक्टरांनी घोषित केलं ब्रेन डेड

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली असून डॉक्टरांकडून त्यांना ब्रेन डेड घोषित केले आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर मागील आठवड्यापासून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार चालू आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या वयैक्तिक सल्लागारानं दिलेल्या माहितीनुसार, श्रीवास्तव यांच्या हृदयाचे ठोकेही मंदावले असून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

राजू श्रीवास्तव यांना बुधवारी (दि.१०) हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते एम्सच्या आयसीयूत भरती आहेत. बुधवारी दिल्लीतील एका जिममध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना ते बेशुद्ध झाले होते. त्यांना दवाखान्यात दाखल केले गेले. त्यांच्या हृदयाच्या एका भागात १०० टक्के ब्लॉकेजेस दिसून आल्यानंतर त्यांच्यावर आतापर्यंत दोन सर्जरीही झाल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीवास्तव यांच्या पत्नीशी फोनवरून संवाद साधत तब्येतीबाबत माहिती घेतली, तसेच त्यांना धीर देत मदतीचे आश्‍वासन दिले आहे. राजू श्रीवास्तव उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेच्या अध्यक्षस्थानी असून २०१२ पासून काही काळ समाजवादी पार्टीसोबत राहिल्यानंतर राजनाथ सिंग यांच्या मदतीने त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.  यानंतर मोदी सरकारच्या स्वच्छता अभियानाचे ते ब्रॅंड ॲम्बेसेडरही बनले. याशिवाय भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशातील स्टार प्रचारक म्हणूनही त्यांचा चेहरा समोर आला होता.

हेही नक्की वाचा

SCROLL FOR NEXT