Latest

Bareilly Ki Barfi : बरेली की बर्फी चित्रपटाची ६ वर्ष, राजकुमार रावची नवी सीरीज चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : "बरेली की बर्फी" या हृदयस्पर्शी चित्रपटाला ६ वर्ष पूर्ण झाली असून या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकून घेतली आणि एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना दिला. या चित्रपटाची जादू कायम आहे आणि राजकुमार राव यांचा एक मुख्य भाग आहे. या चित्रपटातील राजकुमार रावची भूमिका अभिनयात मास्टरक्लास होती. (Bareilly Ki Barfi ) प्रीतम विद्रोही या व्यक्तिरेखेमध्ये स्वतःला भिडवण्याची त्यांची क्षमता प्रत्येक फ्रेममध्ये दिसून आली. त्याने केवळ भूमिकाच केल्या नाहीत; त्याने त्यात जीव फुंकला आहे. राजकुमार राव यांना खरोखरच अपवादात्मक बनवणारी गोष्ट म्हणजे सहजतेने अनेक भावना व्यक्त करण्याची त्यांची क्षमता. (Bareilly Ki Barfi )

"बरेली की बर्फी" मध्ये त्याने आपल्याला हसवले, सहानुभूती दिली आणि वैयक्तिक पातळीवर त्याच्या पात्राशी जोडले. राजकुमार राव, आयुष्मान खुराना आणि क्रिती सेनन यांच्यातील केमिस्ट्री हे चित्रपटाचे प्रमुख आकर्षण होते. विनोदी संवाद आणि आनंददायी गंमतीने हा चित्रपट सजला होता. " बरेली की बर्फी" मधील राजकुमार राव यांच्या अफलातून कामगिरी ही कायम लक्षात राहणार आहे.

चर्चा राजकुमार रावच्या नव्या सीरीजची

राजकुमार राव हा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याने स्वत: ची ओळख निर्माण केली आहे." स्त्री २", "मिस्टर अँड मिसेस माही", आणि "श्री" यासह अनेक आगामी प्रोजेक्ट्मध्ये तो झळकणार देखील आहे. " गन्स अँड गुलाब्स" या त्याच्या आगामी वेब सीरीजने डिजिटल विश्वात बझ निर्माण केला आहे.

प्रमोशन दरम्यान रावला त्याच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. ट्रेंडिंग हॅशटॅगपासून फॅन-मेड मेम्सपर्यंत, डिजिटल फ्लॅटफॉर्मवर सगळीकडे "टिपू"च्या चर्चा आहेत.

SCROLL FOR NEXT