Latest

राजस्‍थानमध्‍ये ‘ईडी’ अधिकार्‍याला अटक, १५ लाखांच्‍या लाच प्रकरणी कारवाई

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थान (Rajasthan) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी ) ईशान्येतील इंफाळ येथील सक्‍तवसुली संचालनालय विभागाचे (ईडी)अधिकारी ( ED Officer) नवल किशोर मीणा (Naval Kishore Meena) याला १५ लाखांची लाच मागितल्‍याप्रकरणी अटक केली आहे. अलवरमध्ये ही कारवाई करण्‍यात आलीएसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. नवल किशो एक मध्यस्थी मार्फत लाच मागत होता, असा आरोप आहे. लाच घेणाऱ्यालाही 'एसीबी'ने पकडले आहे.

'एसीबी' अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये काही लोकांविरुद्ध फसवणूक आणि चिटफंड कंपनी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. या प्रकरणातील संशयिताकडे ईडीचे अधिकारी नवलकिशोर मीणा आणि त्याचा सहाय्यक बाबुलाल मीणा पैशाची मागणी करत होते. चिटफंड कंपनीच्या प्रकरणात त्यांची मालमत्ता जप्‍त करण्‍याची कारवाई टाळण्‍यासाठी पैसे मागितले जात होते.

'ईडी' अधिकारी नवल किशोर मीना हे मूळचे बस्सी, जयपूर येथील आहेत. तसेच त्‍यांचा मदतनीस बाबूलाल मीना हे देखील बस्सी येथील आहेत. या प्रकरणात बाबूलाल मध्यस्थ म्हणून काम करत होते.सध्या तो अलवरच्या खैरथल येथे कनिष्ठ सहाय्यक कार्यालय, सब रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT