Latest

Railways Catering : रेल्वेतील कॅटरिंग व्यवस्था पूर्ववत करण्याचा निर्णय

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
रेल्वे प्रवाशांना आता प्रवासादरम्यान पुन्हा एकदा गरमागरम जेवण उपलब्ध होईल. कोरोना महारोगराईमुळे २३ मार्च २०२० पासून रेल्वेतील कॅटरिंगमध्ये ( Railways Catering ) गरमागरम जेवणाची सुविधा बंद करण्यात आली होती. ही सुविधात आता सोमवारी, १४ फेब्रुवारीपासून पुर्ववत करण्यात येईल. विशेष म्हणजे ३० टक्‍के ट्रेनमध्ये २१ डिसेंबरपासूनच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.उर्वरित ट्रेनमध्ये ( Railways Catering ) रेल्वेतील कॅटरिंग ही सुविधा दोन टप्प्यांमध्ये सुरू केली जाईल.

पहिल्या टप्यात २२ जानेवारीपर्यंत ८०% ट्रेनमध्ये ही सुविधा पूर्ववत करण्यात आली. १४ फेब्रुवारीपर्यंत उर्वरित २० टक्‍के ट्रेनमध्ये ही सुविधा सुरू केली जाईल. प्रीमियम ट्रेन राजधानी, शताब्दी, तेजस सह इतर ट्रेनमध्ये ही सुविधा अगोदर पासूनच सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोना महारोगराईमुळे कॅटरिंग असलेल्या ट्रेनमध्ये सीलबंद पॅकेटातील जेवण प्रवाशांना दिले जात होते.

२२ मार्च २०२० रोजी 'जनता संचारबंदी'नंतर सामान्य ट्रेनचे संचालन थांबवण्यात आले होते.महारोगराईमुळे काही विशेष ट्रेन प्रवाशी सुविधेसाठी सुरू करण्यात आल्या होत्या.१ एप्रिल २०२१ पासून ६५% ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.कोरोना रूग्णांमध्ये घट झाल्यानंतर जवळपास सर्वच ट्रेन रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आल्या. दरम्यान,आता ट्रेनमधील पॅन्टरी कारमध्ये बनवण्यात येणारे जेवणाची सुविधा प्रवाशांना मिळणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT