Latest

रायगड : महाड एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग

मोहन कारंडे

रायगड; पुढारी वृत्तसेवा : महाड एमआयडीसी (MIDC) मधील एस्टेक लाईफसायन्सेस कंपनीला आग लागली. बुधवारी मध्यरात्री १ च्या सुमारास कंपनीमध्ये जवळपास ६ ब्लास्ट झालेत. सुदैवाने सर्व कर्मचारी सुखरूप आहेत.

अॅस्टेक कंपनीच्या ऍडिशनल एमआयडीसी मधील k2 डीडीएल प्लांटला ही आग लागली. कंपनीमध्ये जवळपास २५ कर्मचारी काम करत होते. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कंपनीमध्ये छोटे मोठे जवळपास ६ ब्लास्ट झाले. महाड एमआयडीसी फायर स्टेशन, लक्ष्मी ऑर्गनिक, प्रिव्ही ऑरगॅनिक आणि महानगर परिषदेची फायर स्टेशनची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT