Latest

हमाल कामानंतर राहुल गांधींनी हाती घेतली ‘करवत’!, दिल्‍लीतील फर्निचर मार्केटला दिली भेट

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ( दि. २८) दिल्‍लीतील कीर्तीनगर येथील आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटला भेट दिली. येथील कारागिरांची भेट घेत त्‍यांनी सुतार काम शिकण्‍याचाही प्रयत्‍न केला. याची माहिती त्‍यांनी सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म x वर ( पूर्वीचे ट्विटर ) पोस्‍ट करुन दिली आहे. ( Rahul Gandhi interacts with carpenters )

त्याच्या कौशल्याबद्दल जाणून घेतले आणि थोडे शिकण्याचा प्रयत्न केला…

राहुल गांधींनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, , आज दिल्लीतील कीर्तीनगर येथील आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटमध्ये जाऊन आज सुतार बंधूंची भेट घेतली. मेहनती असण्यासोबतच त्‍याच्‍यामध्‍ये एक अप्रतिम कलाकार देखील आहे. शक्ती आणि सौंदर्य कोरीव कामामध्ये ते तज्ञ आहेत. त्‍यांच्‍याशी चर्चा केली, त्याच्या कौशल्याबद्दल जाणून घेतले आणि थोडे शिकण्याचा प्रयत्न केला. ( Rahul Gandhi interacts with carpenters )

राहुल गांधीनी घेतली हाेती हमाल बांधवांची भेट

मागील काही महिन्‍यांपासून राहुल गांधी यांनी अनेकवेळा कष्‍टकरी आणि सर्वसामान्‍यांशी संवाद साधत त्‍यांच्‍या जगण्‍यातील संघर्ष जाणून घेतला आहे.  नुकतीच त्‍यांनी दिल्‍लीतील आनंद विहार रेल्‍वे स्‍थानकाला भेट देत येथील हमाल बांधवांची भेट घेत सर्वांना चकित केले होते. आनंद विहार रेल्वे स्थानकावर त्‍यांनी हमालांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. तसेच त्‍यांनी हमाल परिधान करत असलेल्‍या लाल शर्ट घालून डोक्‍यावर सामानही उचलले होते.

यापूर्वी राहुल गांधींनी दिल्लीच्या आझादपूर मंडीला भेट दिली होती. काँग्रेस पक्षाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी त्यांच्या अचानक भेटीदरम्यान भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांशी संवाद साधताना दिसले होते. त्‍यावेळी टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. या काळात देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे दर १५० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. तसेच त्‍यांनी दुचाकी मॅकेनिकची अचानक भेट घेवून त्‍याच्‍याशी संवाद साधला होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT