Latest

Rahul Gandhi ED Interrogation : काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवले, बॅरीकेटस तोडले

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नॅशनल हेराल्‍ड प्रकरणी आज सलग तिसर्‍या दिवशी सक्‍तवसुली संचालनालयाने ( ईडी ) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची चौकशी केली. ( Rahul Gandhi ED Interrogation ) दरम्‍यान, 'ईडी' चौकशीचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्ते रस्‍त्‍यावर उतरले. त्‍यांनी टायर पेटवून देत पोलिसांचे बॅरीकेटसही तोडले. कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.

१३ जूनला राहुल गांधी यांची ईडीकडून सलग साडेतीन तास चौकशी झाली होती. ( Rahul Gandhi ED Interrogation ) त्यानंतर १४ जून रोजी  राहुल गांधींची सलग आठ तास चौकशी करण्यात आली. आज सलग तिसऱ्या दिवशी नॅशनल हेराल्ड प्रकरणी त्‍यांची चौकशी होणार आहे. दिल्लीत 13 जूनला ईडीकडून राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावल्यानंतर, त्यांच्या समर्थनार्थ ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

आम्‍ही दहशतवादी आहोत का?

ईडी कारवाईविरोधात रस्‍त्‍यावर उतरलेल्‍या काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना अटक करण्‍यात आली. आम्‍ही दहशतवादी आहोत का, तुम्‍ही आम्‍हाला कशाला घाबरता? असे सवाल करत काँग्रेस नेते दिल्‍ली पोलीस  दडपशाही करत आहेत, असा आरोप चौधरी यांनी केला.

ईडीचा अर्थ 'Examination in Democracy': अखिलेश यादव

राहुल गांधी यांच्‍या ईडी चौकशीचा समाजवादी पार्टीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अखिलेश यादव यांनी निषेध केला आहे. त्‍यांनी टविट करत ईडीचा अर्थ 'Examination in Democracy' आहे असे म्‍हटलं आहे. राजकारणात विरोधी पक्षांना ही परीक्षा पास होणे अनिवार्य आहे. केंद्र सरकार जेव्‍हा सर्व पातळीवर अपयशी ठरते तेव्‍हा या परीक्षेची घोषणा केली जाते। ज्‍यांची तयारी चांगली असते ते अशा परीक्षांना कधीच घाबरत नहीत. परीक्षा लेखी असो की तोंडी परीक्षा कशालाच घाबरत नाहीत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

SCROLL FOR NEXT