Latest

तरुणाईच्या भावनेला हात घालून राहुल गांधींचा पीएम मोदींवर निशाणा, म्हणाले..

दिनेश चोरगे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रचारात सोशल मीडियाचा वापर हे प्रभावी शस्त्र ठरले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यासाठी 'एक्स' अर्थात पूर्वीच्या ट्विटरचा वापर करून देशभरातील युवकांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी एका युवकाने पाठविलेला व्हिडिओ शेअर करून मोदी यांचा "प्रपोगंडा" आता चालणार नाही, असा इशारा दिला आहे.

'आज एका तरुणाने मला हा व्हिडिओ पाठवला! संभ्रम आणि भीतीचे जाळे फोडून आता सत्य बाहेर येत आहे. यावेळी प्रोपोगंडाच्या पप्पांची डाळ शिजणार नाही. जनताच त्यांना आरसा दाखवण्याच्या तयारीत आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी 'एक्स'वरुन पंतप्रधान मोदींवर हल्ला चढविला आहे.

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध थांबविले, असा प्रश्न विचारला असता, एका तरुणीने मोदी यांना "पापा" संबोधून हा सगळा प्रपोगंडा आहे. त्यांनी युद्ध थांबविले तर मग मणिपूर आणि लद्दाखमध्ये जो संघर्ष सुरू आहे. तो पापा म्हणजे, मोदी यांना का थांबवता आला नाही, असा सवाल या तरुणीने विचारला आहे.

इलेक्टोरल बाँडचा हा पैसा आहे. मोदी यांना तो खर्च करायचा आहे. त्यामुळे त्यांनी युद्ध थांबवण्याचा प्रपोगंडा सुरू केला असल्याचेही या तरुणीने व्हिडीओत म्हटले आहे. राहुल गांधी यांनी देशातील तरुणाईकडून सोशल मीडियाचा जास्त वापर होत असल्याचे बघून प्रचारासाठी हा व्हिडिओ शेअर केला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT