Latest

राहूल द्रविड घेणार ऋषभ पंतची शिकवणी; म्हणाला, ‘आली रे आली, आता तुझी..’

अमृता चौगुले

केपटाऊन; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ संकटात असताना ऋषभ पंत याने बेजबाबदारपणे मोठा फटका मारण्याच्या नादात शून्यावर बाद झाला. संघ अडचणीत असताना त्याने दाखवलेल्या बेजबाबदारपणावर सर्वांकडून टीका होत आहे. यानंतर मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड ऋषभ पंत याची चांगलीच शिकवणी घेणार असल्याचे समजते. राहूल माध्यमांशी बोलताना आता त्याच्याशी बोलण्याची वेळ आली असल्याचे सुतोवाच दिले. यावरुन 'आली रे आली आता तुझी बारी आली' असेच तर राहूल द्रविडला म्हणायचे नाही ना.

ऋषभ पंत हा आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या डावात अवघ्या तीन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. आल्या आल्या त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत किपरकडे झेल देऊन बाद झाला. तो बाद होताच समालोचक तसेच माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी ऋषभवर टीकेची झोड उठवली. शिवाय त्याच्या बेजबाबदार खेळीचे सर्वच स्तरातून टीका होऊ लागली.

पत्रकारांनी ऋषभ बाबत विचारणा केली असता राहूल द्रविड म्हणाला, कोणत्या क्षणी कोणते फटके खेळावे याबाबत आता ऋषभशी चर्चा करावी लागेल. तो एक आक्रमक आणि सकारात्मक पद्धतीने खेळणारा खेळाडू आहे. त्याने अशा पद्धतीच्या खेळीने अनेकदा भारताला विजयी केले आहे. त्याच्या विशिष्ट पद्धतीच्या खेळीमुळे त्याला यश देखिल मिळाले आहे. पण आता त्याच्या सोबत बोलण्याची वेळ आली आहे. कधी कोणत्या प्रकारचा फटका खेळावा या संबधी मी त्याच्याशी बोलणार असल्याचे यावेळी राहूल द्रविड याने यावेळी सांगितले.

विराट कोहली खेळण्याबाबत राहूल द्रविड म्हणाला

जोहान्सबर्गमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे व्यथीत झालेले क्रिकेट रसिक विराट कोहली याने पुढील सामना खेळावा अशी मागणी करु लागले आहेत. विराटच्या खेळण्यावरुन विचारले असता मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड म्हणाला, विराट कोहली केपटाऊनमध्ये नक्कीच खेळेल. मैदानावर मी त्याचा सराव करुन घेतला आहे. तेव्हा तो तंदुरुस्त वाटत होता. त्याने मैदानावर काही काळ देखिल घालवला. आता तो पुढच्या सामन्यात मैदानात खेळताना दिसेल.

SCROLL FOR NEXT