Latest

इंद्रसेना रेड्डी त्रिपुराचे तर रघुवर दास ओडिशाचे नवे राज्‍यपाल

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने ओडिशा आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल बदलले असून, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना ओडिशाच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर, भाजप नेते इंद्र सेना रेड्डी नल्लू यांना त्रिपुराचे राज्यपाल बनविण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दोन्ही राज्यपालांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. त्यानंतर राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भातील निवेदन जारी करण्यात आले. दोन्हीही राज्यपालांचा नियुक्ती कालावधी पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून सुरू होईल. रघुवर दास हे झारखंडमध्ये 2014 ते 2019 या कालावधीत मुख्यमंत्री होते. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय संघटनेमध्ये त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता ते ओडिशाचे मावळते राज्यपाल प्रा. गणेशी लाल यांची जागा घेतील.

तेलंगणातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना तेथील भाजप नेते व केंद्रीय भाजप संघटनेतील सरचिटणीस इंद्र सेना रेड्डी नल्लू यांना त्रिपुराच्या राज्यपाल पदाची संधी मिळाली आहे. मावळते राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांचे स्थान इंद्र सेना रेड्डी नल्लू घेतील.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT