Latest

महाराणी एलिझाबेथ यांच्यावर आज अंत्यसंस्कार; ज्यो बायडन यांच्यासह जागतिक नेत्यांची उपस्थिती

मोहन कारंडे

लंडन : महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनीही महाराणी एलिझाबेथ यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. अंत्यदर्शनासाठी जपानचे सम्राट नारुहितो, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह आलेल्या जागतिक नेत्यांचे महाराजा चार्ल्स तिसरा यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये स्वागत केले.

अमेरिकेचे अध्यक्ष बायडन बकिंघम पॅलेसमध्ये जाण्यापूर्वी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालेल्या महाराणी एलिझाबेथ यांनी ७० वर्षे "सेवेच्या कल्पनेचे" अद्वितीय उदाहरण ठेवले आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी आईची आठवण करून दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केल्यानंतर बायडन म्हणाले, "इंग्लंड व ब्रिटनच्या सर्व नागरिकांनो आता आपले ह्रदय आपणा सर्वांपासून दूर जात आहे. तुम्ही भाग्यवान आहात की ७० वर्षांपासून तुम्ही त्यांच्याभोवती आहात. आपण सर्वांनी त्यांचे प्रेम अनुभवले आहे, अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT