Latest

पंजाब : पटियाला हिंसाचाराचा मुख्य आरोपी बरजिंदर सिंह परवानाला अटक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पटियाला हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड बरजिंदर सिंह परवाना याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. मोहालीमधून त्याला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी सांगितले की, "बरजिंदर सिंह परवाना हा मुख्य आरोपी असून तो पटियाला हिंसाचाराचा मास्टरमाईंड आहे. त्याला आज सकाळी मोहालीमधून अटक करण्यात आली आहे."

पोलीस अधिकारी शमिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल इन्टेलिजिंस एजन्सी (CIA) पटियाला टीमने परवानाला विमानतळावर अटक केली. पटियाला येथे शुक्रवारी काली माता मंदिराच्या बाहेर दोन समुदायांकडून तलवारी नाचविण्यात आल्या होत्या. तसेच दगडफेक करण्यात आली होता. त्यामध्ये २ पोलीस कर्मचारी आणि ४ नागरिक जखमी झाले होते. पोलीस अधिकारी छीना यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी पटियाला हिंसाचार प्रकरणासंदर्भात ६ आरोपींना अटक करण्यात आली होती. यामधील हरीश सिंगला, कुलदीप सिंह दंथल आणि दलजीत सिंह, अशी तिघांची नावे आतापर्यंत समोर आली आहेत.

पटियाला हिंसाचार प्रकरण नेमकं काय? 

पटियालामध्ये बंदी घातलेल्या खलिस्तानी या दहशतवादी संघटनेविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेनेने निलंबित केलेला हरीश सिंह याने पटियालामध्ये खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढला होता. यावेळी दोन गटात मोठा हिंसाचार उफाळला. सिंह यांचा गट आणि शिख समुदायातील लोकांचा एक गट काली माता मंदिराबाहेर समोरासमोर आला. एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी तलवारी काढल्या. यावेळी मोठी दगडफेक झाली. या दगडफेकीत काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करावा लागला.

या हिंसाचाराप्रकरणी पटियाला रेंजचे नवे आयजी मुखविंदर सिंग छिना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बरजिंदर सिंग परवाना हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्यावर यापूर्वी ४ एफआयआर दाखल आहेत. या हिंसाचार प्रकरणी शनिवारी (३० एप्रिल) पोलिसांनी दलजीत सिंग आणि कुलदीप सिंग या आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच, परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याबद्दल आणि हिंसाचार भडकावल्याबद्दल चंंडीगड पोलिसांनी हरीश सिंग यालाही अटक केली आहे. या हिंसाचाराच्या घटनेची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हरीश सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ : राज्यसेवा परीक्षेत बाजी मारलेल्या प्रमोदची प्रेरणादायी गोष्ट चला ऐकुया

SCROLL FOR NEXT