Latest

येरवडा कारागृहातील पोलीस शिपायाने स्‍वत:वरच गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा :
येरवडा कारागृहातील पोलीस शिपायाने आज पहाटे स्वत: वर गोळी झाडून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला.  या घटनेने कारागृहात एकच खळबळ माजली. अमोल माने असे आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न करणार्‍या पाेलिस शिपायाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्‍यांनी  कौटुंबिक कारणावरुन हे कृत्य केले असून, त्‍यांच्‍यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने हे येरवडा कारागृहात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांची शनिवारी गार्ड ड्युटी होती. पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडील सरकारी रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. हा प्रकार समजताच सहकार्‍यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच कारागृहातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT