पुणे शहर आणि परिसरात यंदाच्या मोसमीतील सर्वात मुसळधार पावसाने (pune rain upate) सोमवारी (दि.4) सांयकाळी पडला. जोरदार मेघगर्जना आणि विजांच्या कडकडटात मुसळधार पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे डोह साठले. तसेच अनेक सखल भागात पाणी शिरले.
या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडालीच शिवाय शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. सिग्नल यंत्रणामध्ये बिघाड झाल्यामुळे लाबंचलांब रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. वीजयंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे बहुतांशी ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडला. तर झाडपडीच्या घटनाही घडल्या असल्याचे दिसून आले.
पुणे शहर आणि परिसरात सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. प्रखर उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. आकाशात ढगांची संख्या भरपूर होती. सायकाळी सहाच्या सुमारास शहराला काळ्या ढगांनी घेरले आणि विजांच्या जोरदार कडकडाटात व मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला (pune rain upate) सुरूवात झाला.
पहिल्यांदा अर्धा तास पाऊस पड्ल्यावर साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाऊस थांबला.मात्र त्यानंतर पुन्हा सव्वासात वाजण्याच्या सुमारास अचानाक अतिमुसळधार पावसाला सुरूवात झाली. विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने शहरात दाणादाण उडवून दिली. सुमारे दीडतास एकाच वेगाने पाऊस कोसळत होता. त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. पाण्याचे लोट वाहत होते.
पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता की, काही वेळातच शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील वाहतुक विस्कळीत झाली. तसेच अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. तर झाडपडीच्या घटना घडल्या.
पुणे शहर आणि परिसरात 9 ऑक्टोबरपर्यत 'यलो अलर्ट' चा इशारा (अचानक मुसळधार पाऊस) पुणे वेधशाळेने दिला आहे. घाटमाथ्यासह शहर आणि जिल्ह्यातही काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावधाता बाळगावी असे आवाहन ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञन डॉ.के.एस. होसाळीकर यांनी केले आहे.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/3oifdA68ogw