Latest

पुणे : भुकूम परिसरात बिबट्यासह बछड्याचे दर्शन

backup backup

पिरंगुट (जि. पुणे), पुढारी वृत्तसेवा

भुकूम (ता. मुळशी, जि. पुणे) परिसरात बिबट्या आणि त्याचे पिल्लू दिसल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. १६) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खाटपेवाडी रोडला मुळशी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयालगत असणाऱ्या माळरानामधून बिबट्या व त्याचा बछडा आला. बिबट्या खाटपेवाडी रस्तावरुन ज्वारीच्या शेतामध्ये घुसल्याचे प्रत्यक्षदर्शी युवकांनी सांगितले.

भुकूमला शासनाचे ४३ एकर बीज गुणन प्रक्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये बिबट्या जाऊन बसला. या परिसरामध्ये कोणीही राहत नाही. मात्र, शेजारीच पानसरे वस्तीवर गाई आणि म्हशींचे गोठे आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावच्या पश्चिम बाजूस असलेल्या माळरानावर गवत आहे. तसेच या परिसरात पिरंगुटच्या बाजूने हरणांसारखे वन्यजीव येत असतात. त्यांचा माग काढत बिबट्या येथे आला असावा असा अंदाज वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT