Latest

Pudhari Talent Search : ‘पुढारी टॅलेंट-सर्च एक्झाम’च्या प्रश्नावलीस आजपासून प्रारंभ

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Pudhari Talent Search : विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, यासाठी दै. 'पुढारी'तर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जानेवारी 2024 मध्ये 'पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम' घेण्यात येणार आहे.

1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीत दै. 'पुढारी'मधील विश्वसंचार पानामधील मजकुरावर आधारित दररोज एक याप्रमाणे 150 प्रश्न प्रसिद्ध होणार आहेत.

'पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम' तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ही परीक्षा मराठी व सेमी, इंग्लिश माध्यमांच्या शाळांसाठी असणार आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. पेपर 1- मराठी+गणितसाठी 75 प्रश्न व 150 गुण असतील. ही परीक्षा 11 ते 12.30 या वेळेत होईल. पेपर 2- इंग्रजी+बुद्धिमत्ता 75 प्रश्न व 150 गुण असणार आहेत. दुपारी 1.30 ते 3 या कालावधीत परीक्षा होईल. परीक्षा एकूण 300 गुणांची असणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी सहभाग शुल्क 125 रुपये असणार आहे. जानेवारी 2024 मधील तिसरा किंवा चौथ्या रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. Pudhari Talent Search

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना 15 लाखांची भरघोस बक्षिसे दिली जातील. परीक्षेसाठी अर्ज करण्याची 10 ऑगस्ट अंतिम मुदत आहे. संपूर्ण भरलेला परीक्षा अर्ज शाळेतील शिक्षक, वृत्तपत्र विक्रेते आणि नजीकच्या दै.'पुढारी' कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे सह-प्रायोजक 'पीएनजी' ज्वेलर्स आहेत.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT