Latest

‘उषा स्‍कूल ऑफ ॲथलेटिक्स’च्‍या जमिनीवर अतिक्रमण : पीटी उषा यांचा गंभीर आरोप

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माझी खासदारपदी निवड झाल्‍यापासून केरळमधील कोझिकोड येथील उषा स्‍कूल ऑफ ॲथलेटिक्सच्‍या जमिनीवर काही जणांकडून अतिक्रमण आणि गुंडगिरी केली जात आहे, असा गंभीर आरोप भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष आणि भारताची दिग्गज धावपटू पीटी उषा यांनी आज ( दि. ४ )दिल्‍ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. केरळचे मुख्‍यमंत्री विजयन यांनी याप्रकरणी तत्‍काळ कारवाई करावी, अशी मागणीही त्‍यांनी यावेळी केली.

यावेळी पीटी उषा म्‍हणाल्‍या, उषा स्‍कूल ऑफ ॲथलेटिक्सच्‍या जमिनीवर काही जणांकडून अतिक्रमण होत आहे. अतिक्रमण आणि अवैध बांधकामाची माहिती पानागढ पंचायतीला आहे. मुलींच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने ही गंभीर बाब आहे. मला मुलींच्‍या सुरक्षेची काळजी आहे. यामुळे कोणीही विद्यार्थीनींच्या कँपसमध्ये घुसू शकतं. यापूर्वी अकादमीभोवती कुंपण बांधण्याचा प्रयत्न केला होता; परंतु आर्थिक अडचणींमुळे ते शक्‍य झाले नाही, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

६ जुलै २०२२ रोजी माझी राज्‍यसभा खासदारपदी निवड झाली. यानंतर को्रजकोडी येथील अकादमीला टार्गेट केले जात आहे.काहींनी अकादमीच्‍या जागेत अतिक्रमण करुन बांधकाम सुरु केले. अकादमीच्‍या व्‍यवस्‍थापकांनी याला अटकाव करण्‍याचा प्रयत्‍न केला यानंतर त्‍यांच्‍याशी गैरवर्तन करण्‍यात आले. याप्रकरणी आम्‍ही पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर अतिक्रमणधारकांना अकादमीतून हटवण्‍यात आले आहे, असेही पीटी उषा यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT