Latest

Eye care : उन्हापासून बचाव डोळ्यांचा!

दिनेश चोरगे

डॉ. मनोज शिंगाडे : ऋतूंनुसार डोळ्यांची काळजी वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायला हवी हे आपण जाणतो, पण त्याद़ृष्टीने जाणीवपूर्वक आपण करत मात्र फारसे काही नाही ही वस्तुस्थिती आहे. वातावरणाचा शरीरावर विपरित परिणाम होत असतो. विशेषत: उन्हात फिरणार्‍या, उन्हात काम करणार्‍या व्यक्तींनी तर डोळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी.

डोळ्यांसारख्या नाजूक भागांवर नेहमीच्या उन्हाचा तर परिणाम होतच असतो; मग उन्हाळ्याच्या दिवसांची तर बातच सोडा! या दिवसांत डोळ्यांची अ‍ॅलर्जी वाढते. डोळे लाल होतात. डोळ्यांतून पाणी येते. वातावरणातील धूळ व सूक्ष्म धुलीकणांचा व तप्त वातावरणाचा डोळ्यांवर परिणाम होत असतो. या दुष्परिणामांपासून डोळ्यांचे संरक्षण करायचे असेल तर काही गोष्टी करून पाहा :

  • दिवसातून अनेकवेळा डोळ्यांवर पाण्याचा हबकारा मारा. ऋतू कुठलाही असो, डोळे सतत पाण्याने धुणे हे डोळ्यांच्या आरोग्याच्या द़ृष्टीने अतिशय चांगले आहे.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
  • कडक उन्हात घराच्या बाहेर पडताना डोळ्यांवर चांगल्या दर्जाचा गॉगल वापरणे अतिशय चांगले.
  • उन्हाळ्याच्या दिवसात जसे चेहर्‍यावर मुरूम किंवा गळू येतात तसेच हे गळू डोळ्यातही येतात. त्याला स्थानिक भाषेत आंजुर्ली, रांजणवाडी असेही काही लोक म्हणतात. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण थोडे जास्त असते. यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे डोळ्यांना दिवसातून तीन वेळा गरम पाण्यातून शेक द्या. शेक देताना डोळ्यांना गरम उकळते पाणी थेट लावू नका. स्वच्छ रुमाल गरम पाण्यात भिजवून डोळ्याला शेक द्या. वास्तविक डोळे हा नाजूक अवयव असल्याने याबाबत घरगुती उपाय करण्यापेक्षा नेत्ररोगतज्ज्ञांना दाखवल्यास काही ड्रॉप्सच्या माध्यमातून यावर चटकन नियंत्रण मिळवता येऊ शकते.
  •  डोळे आले तर उन्हाळ्याच्या दिवसात संसर्गामुळे कधी तरी डोळ्याची साथ पसरण्याची भीती असते. त्यात डोळे लाल-लाल होतात. डोळ्यातून चिकट पांढरा पदार्थ बाहेर पडतो. अशा वेळेस डोळ्यात अँटीबायोटिक्स टाकण्याची गरज नसते. डोळे सतत साफ करत राहा. चिकट पांढरा पदार्थ साफ करा. डोळे आलेल्या व्यक्तीच्या वैयक्तिक वापराच्या म्हणजे टॉवेल, कपडे व इतर वस्तू दुसर्‍याने वापरू नये. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या- डोळ्यात बघून डोळे येत नाहीत तर संसर्गाने डोळे येतात. डोळे आलेल्या व्यक्तीने शक्यतो ऑफिसला व सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. डोळे आलेल्या व्यक्तीने डोळ्यांना लावलेला हात टेलिफोन, काम्प्युटर किंवा इतर वस्तूला लागला असेल तर त्याची लागण दुसर्‍याला होऊ शकते. त्यामुळे डोळे आलेल्या व्यक्तीने आपल्यामुळे दुसर्‍याला डोळ्यांचा संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी.
  • डोळ्यांच्या एकंदर आरोग्यासाठी, सुद़ृढतेसाठी हिरव्या पालेभाज्या, गाजर, शेवग्याच्या शेंगा यांचा समावेश आहारात करा.
  • उन्हाच्या तडाख्यापायी डोळे लाल झाले तर बाजारात मिळणारी औषधे स्वतःहून डोळ्यात न टाकता साध्या स्वच्छ पाण्याने डोळे धुणे अतिशय हितकारक आहे.
  • या दिवसात अनेकदा डोळे कोरडे पडतात. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणार्‍यांना त्याचा त्रास होऊ शकतो. डोळे कोरडे पडत असतील तर मॉयश्चराईज ड्रॉप डोळ्यात टाका. कॉन्टॅक्ट लेन्सेसही साफ ठेवा.हेही वाचा :  
  • Global Warming : आगामी पाच वर्षांमध्ये जगभरात वाढणार उकाडा 
  • माळढोक, गिधाडांच्या प्रजाती धोक्यात; दुर्मिळ गिधाडांच्या भारतात फक्त नऊ प्रजाती अस्तित्वात 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT