Latest

महाविद्यालयात ‘जय श्री राम’ घोषणा दिल्याने स्टेजवरुन खाली उतरवणारे प्राध्यापक निलंबित; गाझियाबादमधील घटना

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझियाबादच्या ABES अभियांत्रिकी महाविद्यालयात एका कार्यक्रमादरम्यान जय श्री रामचा जयघोष करणाऱ्या विद्यार्थिनीला स्टेजवरून खाली खेचल्याबद्दल प्राध्यपकांना आज (दि. २१) निलंबित करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाविद्यालयात त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून शनिवारी (दि. २१) दोन महिला प्राध्यपकांवर कारवाई करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या एबीईएस या इंजिनिअरिंग महाविद्यालयात बीटेक विद्यार्थ्यांच्या इडक्शन प्रोग्राममध्ये काही विद्यार्थ्यांनी जय श्री राम अशा घोषणा दिल्या. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हाययरल झाला. या व्हिडिओमध्ये महिला प्राध्यापकाने घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यासपीठावरून खाली उतरवले. तसेच विद्यार्थ्यांना शिवीगाळ देखील केल्याचे व्हिडीओतून दिसून येत आहे. या घटनेनंतर हे प्रकरण चिघळले. आज या प्रकरणातील प्राध्यपकांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्हायरल व्हिडीओत महिला प्राध्यापिकेने विद्यार्थिनीला खडसावले

एबीईएस या इंजिनिअरिंग महाविद्यालयात घडलेल्या घटनेतील व्हायरल व्हिडीओत जय श्री राम म्हणाताच महिला प्राध्यापिकेने विद्यार्थिनीला खडसावले आणि विचारले की, तुम्हाला घोषणाबाजी करण्यासाठी हे व्यासपीठ दिले आहे का? तुम्ही जय श्री राम कसे बोललात? प्रत्युत्तरात विद्यार्थ्याने त्याला सांगितले की, विद्यार्थ्यांकडून आवाज येत आहेत, त्यानंतर मी उत्तर दिले. विद्यार्थिनीचे म्हणणे ऐकून महिला प्राध्यापक अधिकच संतापल्या. यानंतर त्यांना मंचावरून हटवले.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी आपला निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर महिला प्राध्यापिकेच्या निलंबनाची मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कोणतेही निवेदन आलेले नाही.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT