Latest

Met Gala : मेट गालाच्या रेड कार्पेटवर प्रियांका राज! निक जोनाससोबत लक्षवेधी लूक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूयॉर्कमध्ये प्रत्येक वर्षी मे महिन्यात मेट गाला सोहळा साजरा केला जातो. यावेळी प्रियांका चोप्राचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रियांका निक जोनाससोबत पोहोचली, (Met Gala ) तेथील उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

या (Met Gala) सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Met Gala)

यामध्ये प्रियांका ब्लॅक कलर गाऊनमध्ये दिसते. तिने डायमंड नेकलेससोबत आपला लूक पूर्ण केला होता. (Met Gala)

जेव्हा प्रियांका चोप्रा जोनास न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या खास पायऱ्यांवर पोहोचली, तेव्हा फॅशनची एक वेगळी झलक सगळ्यांना पहायला मिळाली.

प्रियांकाच्या फॅशनने सगळ्यांची मन जिंकून घेतली. उपस्थित प्रेक्षकांनी सुंदर, अप्रतिम असे म्हणत तिचे कौतुक केलं.

'कार्ल लेजरफिल्ड: ए लाईन ऑफ ब्युटी' या थीमला अनुसरून प्रियांकाने ब्लॅक कॅडी स्ट्रॅपलेस ड्रेस आणि लेदर ग्लोव्हज घातले होते. तिचा मेकअप आर्टिस्ट सारा तन्नो यांनी केला आहे. प्रियांका आणि टॅनो यांनी क्लासिक मॉर्डन लूक एकत्र करून एक नवीन लूक तयार केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT