पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीसला पोहोचले आहेत. ते किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून ग्रीसच्या त्यांच्या पहिल्या भेटीसाठी ग्रीसला पोहोचले आहेत. ग्रीसला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे गेल्या ४० वर्षांतील पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यावर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२५) ग्रीस दौऱ्यावर आहेत. ग्रीसला ४० वर्षांनी जाणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. १९८३ मध्ये भारताचे पंतप्रधान ग्रीसला गेले होते. पीएम मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून अथेन्स येथे पोहोचले. ते जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले होते.
"परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते, अरिंदम बागची म्हणाले, "अथेन्समध्ये थोड्या वेळाने ते सैनिकांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर ते ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षांना भेटतील आणि त्यानंतर ग्रीसच्या पंतप्रधानांशी चर्चा करतील." त्याचबरोबर चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेल्या समुदायाशी ते संवाद साधतील.
हेही वाचा