Latest

Satish Kaushik : अभिनेते सतीश कौशिक यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक ( Satish Kaushik ) यांच्या निधनानंतर कला जगतावर शोककळा पसरली आहे. होळी साजरी करण्यासाठी दिल्लीत आलेल्या कौशिक यांनी आकस्‍मिक 'एक्झिट' घेतली. त्‍यांना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

सतीश कौशिक ( Satish Kaushik ) हे बुधवारी सकाळी साडे दहा वाजता दिल्लीतील द्वारका सेक्टर-२३ येथे वास्तव्यास त्याच्या मित्राकडे आले होते. होळी साजरी केल्यानंतर ते दिल्लीत थांबले होते. दरम्यान रात्री अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांचे व्यवस्थापक संतोष राय यांना फोन केला. राय तत्काळ त्यांना फोर्टिस रुग्णालयात घेवून गेले. पंरतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मुंबईत त्यांच्या पार्थिव्यावर अंतिम संस्कार होणार आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. "कौशिक एक रचनात्मक प्रतिभा होते. अद्भुत अभिनय तसेच दिग्दर्शनातून त्यांनी सर्वाची मन जिंकली होती. त्यांचे कार्य सदैव दर्शकांचे मनोरंजन करीत राहील," अशा शब्दात पंतप्रधानांनी ट्विटरवरून भावना व्यक्त केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT