Latest

petrol diesel price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

backup backup

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : मागच्या दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज प्रतिलिटर पेट्रोल ८४ पैसे आणि डिझेल ८५ पैशांनी वाढले. यामुळे सामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. मागच्या १५ दिवसांमध्ये १३ वेळा ही वाढ झाली आहे. (petrol diesel price)

मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर ११९.६७ रुपये (८४ पैशांनी वाढले) आणि १०३.९२ रुपये (८५ पैशांनी वाढले), तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे १०४.६१ रुपये प्रति लिटर आणि ९५.८७ रुपये प्रति लिटर (८० पैशांनी वाढले)गेल्या १५ दिवसांमध्‍ये पेट्रोल दरात झालेली वाढ ९.२० रुपये इतकी आहे.

देशातील आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारातील किमतींनुसार इंधन तेलाच्या देशांतर्गत किमती दररोज सुधारल्या जातात. या नवीन किमती दररोज सकाळी 6 वाजता लागू होतात. तुम्ही घरी बसूनही इंधनाची किंमत जाणून घेऊ शकता.

घरी बसून तेलाची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल संदेश सेवा अंतर्गत ९२२४९९२२४९ या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. तुमचा संदेश 'RSP-पेट्रोल पंप कोड' असेल. तुम्हाला हा कोड इंडियन ऑइलच्या https://iocl.com/petrol-diesel-price या पेजवरून मिळेल.

petrol diesel price : भारतात सर्वात जास्त दर परभणीत

परभणी देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल मिळणारे शहर म्हणून समोर आले आहे. काल ५ एप्रिल रोजी परभणीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर रु. १२१.३४ आणि डिझेलचा दर प्रतिलिटर रु. १०३.९५ वर पोहोचला आहे. यामुळे आता परभणी भारतातील सर्वात पेट्रोल-डीझेल मिळणारे शहर झाले आहे.

परभणीला उत्तर महाराष्ट्र अथवा विदर्भातून इंधन आणावे लागते. विदर्भातून इंधन परभणीपर्यंत येण्यासाठी किंवा मनमाड मार्गे परभणीत इंधन येण्यासाठीचा खर्च जास्त लागतो. मनमाडवरून परभणीपर्यंतचे अंतर 350 किलोमीटरपर्यंत पडते. हा खर्च वसूल करण्यासाठी परभणीचे पेट्रोलचे दर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त दिसून येतात.

SCROLL FOR NEXT