Latest

Joe Biden speeches in Hindi | अमेरिकेतील राजकारणात वाढला भारतीयांचा दबदबा, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आता बोलणार हिंदीत!

दीपक दि. भांदिगरे

वॉश्गिंटन; पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या राजकारणात आशियाई-अमेरिकनांचा प्रभाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षीय आयोगाने व्हाईट हाऊसला राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या सर्व भाषणांचे हिंदी (Joe Biden speeches in Hindi) आणि मोठ्या प्रमाणात अमेरिकन बोलत असलेल्या इतर आशियाई भाषांमध्ये भाषांतर करण्याची विनंती केली आहे. राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यांची भाषणे केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामुळे ही भाषणे अडीच कोटी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. ज्यांचे इंग्रजी कच्चे आहे.

आशियाई-अमेरिकन (AA), नेटिव्ह हवाईयन आणि पॅसिफिक आयलँडर्स (NHPI) वरील अध्यक्षांच्या सल्लागार आयोगाने या आठवड्यात आपल्या बैठकीत याबाबत एक शिफारस केली. या बैठकीत भारतीय-अमेरिकन समुदायाचे नेते अजय जैन भुतोरिया यांनी एक प्रस्ताव मांडला होता, जो आयोगाने स्वीकारला आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये राहणारे आणि एक यशस्वी उद्योजक असलेले भुतोरिया AA आणि NHPI वरील अध्यक्षांच्या सल्लागार आयोगाचे सदस्य आहेत.

या बैठकीदरम्यान आयोगाने शिफारस केली आहे की या प्रस्तावाच्या तीन महिन्यांच्या आत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांच्या महत्त्वाच्या भाषणांचे प्रतिलेख अनेक आशियाई-अमेरिकन आणि एनएचपीआय भाषांमध्ये अनुवादित केले जावेत आणि शक्य तितक्या लवकर म्हणजे एक आठवड्याच्या आत ते व्हाईट हाऊसच्या वेबसाइटवर उपलब्ध केले जावेत. आयोगाने शिफारस केलेल्या भाषांमध्ये भाषा हिंदी, चिनी, कोरियन, व्हिएतनामी, तागालोग आणि मंदारिन यांचा समावेश आहे. ही भाषांतरित केलेली भाषणे व्हाईट हाऊस ऑफ पब्लिक एंगेजमेंट कार्यालयामार्फत प्रसारमाध्यमे आणि समुदायांपर्यंत पोहोचवावीत, अशी विनंतीही व्हाईट हाऊसला करण्यात आली. (Joe Biden speeches in Hindi)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT