Latest

Samsung Galaxy च्या ‘या’ दोन फोनचे ‘प्री बुकिंग’ सुरु, दिली भन्नाट ऑफर!

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : सॅमसंग गॅलक्सी Samsung Galaxy Z Fold 4 व Galaxy Z Flip 4 ची 'प्री बुकिंग' आजपासून भारतात सुरू झाले आहे. Galaxy Z Flip 4 ची किंमत 90,000 रुपयांपासून सुरू आहे तर Galaxy Z Fold 4 ची किंमत रुपये 1.55 लाख रुपयांपासून पुढे आहे. सॅमसंगने नुकत्याच लाँच केलेल्या या दोन्ही मोबाईलचे प्री बुकिंग आजपासून भारतात सुरू झाले आहे. प्री बुकिंवर सॅमसंगकडून आकर्षक ऑफर देण्यात आली आहे.

जास्तीत जास्त ग्राहकांनी प्री बुकिंग करावे यासाठी सॅमसंगने या दोन्ही मोबाइलवर तब्बल 45 हजार रुपयांपेक्षा जास्तचा लाभ ग्राहकांना होणार आहे. ही ऑफर फक्त 36 तासांसाठी सुरू राहणार आहे. आज मंगळवारी दि. 16 दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होऊन 17 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. याशिवाय ड्युओचे 5199 रुपये किमतीचे वायरलेस चार्जर फ्री भेटणार आहे.

Samsung Galaxy Z Fold 4 व Galaxy Z Flip 4 हे फोल्डिंग पॅटर्नमध्ये अतिशय अॅडवान्स्ड फिचर्समध्ये असलेले मोबाइल सॅमसंगने लाँच केले आहे. याचे प्री बुकिंग तुम्ही सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन करू शकता किंवा या spr.ly/6017zhvY3 लिंकवर जाऊन तुम्ही ही ऑफर ग्रॅब करू शकता.

हे ही वाचा

SCROLL FOR NEXT