Latest

Lok Sabha Elction 2024: वंचितचा नवा प्रस्ताव: काँग्रेस अध्यक्षांना पत्र; पवार- ठाकरेंवर व्यक्त केली नाराजी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क :   लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा आजही कायम राहिला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बैठक घेत नाहीत, अशी नाराजी व्यक्त करत वंचित बहुजन आघाडी काँग्रेसच्या सात जागांना जाहीर पाठिंबा देईल, त्यांची नावे जाहीर करावीत, असा नवा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जन खरगे यांना पाठविले आहे. आता यावर काँग्रेस कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.  Lok Sabha Elction 2024

दरम्यान, लोकसभा निवडणुकीला (LokSabha Elections 2024) अवघा महिना उरला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. सात टप्प्यातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिलपासून मतदान सुरू होणार आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) आज बैठक होणार असून, त्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा निश्चित केला जाणार आहे. तसेच उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक समितीचीही बैठक

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचीही आज बैठक होणार आहे. काँग्रेस मुख्यालयात सकाळी १० वाजता ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठकही होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Elections 2024) पक्षाच्या उर्वरित उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT