Latest

Prajaktta Mali : प्राजक्ता माळी नव्या चित्रपटातून भेटीला, हटकी कथा “भिशी मित्र मंडळ”ची

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे.  (Prajaktta Mali) आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. "भिशी मित्र मंडळ" असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. याप्रसंगी अभिनेत्री प्राजक्तासोबत चित्रपटाचे निर्माते, प्रस्तुतकर्ते, लेखक, दिग्दर्शक आणि तांत्रिक टीम आवर्जून उपस्थित होती. (Prajaktta Mali)

संबंधित बातम्या –

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने या व्हिडिओला कॅप्शन दिलीय-'ह्या वर्षातील पुढील चित्रपटास प्रारंभ; काल पुण्यात मुहूर्त पार पडला.. ?'

अमोल कागणे आणि शरद पाटील हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सागर पाठक लिखित, सुमित संघमित्र दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण आता लवकरच पुणे येथे सुरु होणार असून संजीवकुमर चंद्रकांत हिल्ली ये सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत.

SCROLL FOR NEXT