Latest

Prajakta Gaikwad : मराठमोळ्या प्राजक्ताला पाहून नेटकऱ्यांकडून कमेंट्सची बरसात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) आता आणखी सुंदर दिसू लागली आहे. तिचा फिटनेस आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावरे भूरळ घातलीय. तिने 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातली होती. आता तिच्या नव्या फोटोंनी सर्वांचचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Prajakta Gaikwad)

'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरलं होतं. या मालिकेत येसूबाईंचे पात्र हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारले होते. नेटकरीही आताही प्राजक्ताला ताईसाहेब असंच संबोधतात. यानंतर ती 'आई माझी काळुबाई' या मालिकेत दिसली होती. या मालिकेत ती आर्या नामक मुलीची भूमिका साकारली होती.

करिअरच्या सुरुवातीलाच तिने अभिनयाची छाप पडली असून त्यांचा चाहता वर्ग देखील निर्माण झाला आहे. तिने नांदा सौख्य भरे या मालिकेतही महत्वाची भूमिका साकारलीय. संत तुकाराम मालिकेतील संत बहिणाबाईचे पात्र देखील सशक्तरितीने रंगविले आहे.

याआधी प्राजक्ता गायकवाड हिला ऐतिहासिक भूमिकेमधून प्रेक्षकांनी पाहिलं आहे. पण, कॅज्युअल लूकमध्येही ती तितकीच सुंदर दिसतेय.

फिटनेस फ्रिक आहे प्राजक्ता

प्राजक्ताचा फिटनेसही चांगला आहे. ती कधीच व्यायाम चुकवत नाही. तिचे एक्सरसाईजचे अनेक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT