Latest

Pragyan Rover : इस्रोकडून ‘प्रज्ञान’चा चंद्राच्या पृष्ठभागावर फिरतानाचा व्हिडिओ शेअर (पाहा व्हिडिओ)

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : इस्रोने चंद्राच्या पृष्ठभागावरील रोव्हर फिरतानाच्या हालचालींचा व्हिडिओ isro च्या अधिकृत एक्स  (ट्विटर) अकाऊंटवरून  शेअर केला आहे. यामध्ये इस्रोने 'प्रज्ञान' रोव्हर दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी 'शिवशक्ती पॉइंट' भोवती फिरत आहे, असे इस्रोने (Pragyan Rover) म्हटले आहे.

Pragyan Rover: चंद्रावर लँडर उतरलेली जागा आता 'शिवशक्ती' पॉईंट- पीएम मोदी

चांद्रयान-३ चे लँडर ज्या ठिकाणी उतरले, ती जागा आता 'शिवशक्ती' म्हणून ओळखली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूर येथील इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये बोलताना केली. "२३ ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर ध्वज फडकावला. आतापासून हा दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून ओळखला जाईल", (Pragyan Rover) अशी घोषणाही पीएम मोदी यांनी आज (दि.२६) केली.

यावेळी शिवमध्ये  मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे. ही शक्ती आपल्याला ते संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य देते. चंद्राचा हा शिवशक्ती पॉइंट हिमालय आणि कन्याकुमारीशी जोडण्याची भावना देखील देतो,असेही पीएम मोदी यांनी स्पष्ट (Pragyan Rover) केले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT