Latest

Salaar Box Office Collection Day 2 : प्रभासने मोहात पाडलं! सालारने तोडले कमाईचे रेकॉर्ड

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभास स्टारर सालारला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिक्रिया मिळत आहे. रिलीज होताच चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ८० कोटींची धमाकेदार ओपनिंग केली होती. (Salaar Box Office Collection Day 2) एक दिवस आधी रिलीज झालेला शाहरुख खान स्टारर डंकीला प्रभासचा चित्रपट सालारने टक्कर दिलीय. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सालारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झाली. वीकेंडचा फायदाही सालारला झाला. (Salaar Box Office Collection Day 2)

संबंधित बातम्या –

सालारच्या धमाकेदार ओपनिंगने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवशी शो हाऊसफुल्ल ठरला. दुसऱ्या दिवशीदेखील चित्रपटाच्या कमाई भर पडत गेली. दुसऱ्या दिवशीच्या कमाईचा आकडा जगभरात जवळपास १८०-२०० कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. बाहुबली आणि बाहुबली २ नंतर सालार देखील प्रभासचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. सालारला प्रशांत नीलने दिग्दर्शित केलं आहे. चित्रपटामध्ये प्रभासशिवाय श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू आणि टीनू आनंद यासारखे स्टार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ॲडव्हान्स बुकिंग प्रकरणात प्रभासच्या सालारने शाहरुखच्या डंकीलादेखील मागे सोडलं होतं. हेच नाही तर सालार यूएसएमध्ये सर्वाधिक ॲडव्हान्स बुकिंग करणारी भारतीय चित्रपट बनला आहे. भारतात ॲडव्हान्स बुकिंगच्या चित्रपटाने जवळपास ४९ कोटींचे बिग कलेक्शन केलं आहे. कमाईचा हा आकडा बॉक्स ऑफिसवर एक दिवस आधी रिलीज झाला.

SCROLL FOR NEXT