Latest

Post-COVID: जेजे रूग्णालयात बालकांमध्ये आढळली पोस्ट कोविडची लक्षणे

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून जगभरासह भारतातही कोविड प्रकरणे कमी होताना दिसत आहेत, मात्र सध्या मुंबईतील जेजे रूग्णालयात पाच बालकांमध्ये पोस्ट कोविडची लक्षणे आढळल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ६० दिवसात मुंबईतील जेजे रूग्णालयातील काही लहान बालकांमध्ये पोस्ट कोविडची लक्षणे आढळून आली आहेत.

जेजे रूग्णालयाने पोस्ट कोविडची लक्षणे असलेली एकूण सहा प्रकरणे नोंदवली आहेत. यामध्ये एका नवजात बालकाचाही समावेश आहे.   या सहा बालकांच्यात मल्टीसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोमची (एमआयएस-सी) लक्षणे आढळून आले असल्याचे रूग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पोस्ट कोविडची शंका असल्यास दुर्लक्ष करू नये,  असे आवाहन जेजे रूग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापले यांनी स्पष्ट केले आहे.

यामध्ये एक लहान मुलगी गेल्या ४० दिवसांपासून पोस्ट कोविडच्या मल्टीसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोम या लक्षणांशी लढत आहे. तिला मंगळवारी (दि.०७) घरी पाठवण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये तिच्या जन्मानंतर कोविड टेस्ट करण्यात आली होती, तेव्हा तिच्यात कोणतीही लक्षणे आढली न्हवती, पण त्यानंतर तिच्या अँटीबॉडीज् टेस्ट केल्यानंतर तिच्यात पोस्ट कोविडची लक्षणे आढळली होती. तेव्हा तिच्यात पोस्ट कोविडची म्हणजेच, मल्टीसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोमची (एमआयएस-सी) लक्षणे मोठ्या प्रमाणात आढल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तिच्या आई पुनम भोरे (वय-२२ वर्षे) हिला गर्भावस्थेदरम्यान कोविडची कोणतीही लक्षणे न्हवती, पण आठव्या महिन्यात ताप आणि सर्दी होती. तिने कोणत्याही प्रकारे लसीकरण घेतले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT