Latest

Portfolio Rebalancing | ‘री बॅलेन्सिंग’ प्रत्येक पोर्टफोलिओत का आहे गरजेचे?

अनुराधा कोरवी

प्रत्येक गुंतवणूकदारांना बुल रन (तेजी) आवडत असते. कोणत्याही मालमत्तेची किंमत वाढली की त्याचा धनसंचय देखील वाढतो. मात्र, या काळात पोर्टफोलिओत जोखीमदेखील वाढत जाते. अशावेळी त्याने पोर्टफोलिओमध्ये असलेली जोखीम नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी चांगला मार्ग म्हणजे असेट अलोकेशनच्या मार्गाला फॉलो करणे होय. यात शिस्त असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर फंडस्चे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. (Portfolio Rebalancing)

संबंधित बातम्या 

तेजीचा परिणाम

'बुल रन'मध्ये गुंतवणूकदारावर होणारा परिणाम म्हणजे त्याची असेटस् व्हॅल्यू वेगाने वाढत जाते. इक्विटीज फंडमध्ये तेजी येते तेव्हा त्याच्या मूल्यांत वेगाने वाढ होते. गुंतवणूकदारांसाठी ही चांगली बातमी असते. कारण त्याच्या पोर्टफोलिओतील मूल्य वाढलेले असते आणि त्याला ध्येय साध्य करण्यास मदत मिळते. त्याचवेळी मूल्यांच्या गुंतवणुकीसमोर अडचणदेखील येते. कारण, ही असेट किती दीर्घकाळापर्यंत होल्ड केली जाते, हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

गुंतवणुकीचे प्रारंभीचे ठेवलेले ध्येय मिळवण्यासाठी त्याची विक्री करत फायदा मिळवता येणे शक्य आहे; परंतु जेव्हा मूल्य वाढते तेव्हा मनात लोभ निर्माण होतो आणि त्याच्या विक्रीचा निर्णय लांबणीवर पडतो. शेवटी जोखीम वाढते, कारण पोर्टफोलिओ एका दिशेला अडकून पडतो. अशावेळी गुंतवणूकदाराला हवा असणारा लाभ मिळत नाही.

री बॅलेन्सिंगच्या माध्यमातून असेट अलोकेशन

या स्थितीला हाताळण्यासाठी चांगला मार्ग म्हणजे असेट अलोकेशनचे स्ट्रक्चर व्यवस्थित असणे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास असेट अलोकेशनच्या रणनीतीनुसार पोर्टफोलिओत असलेल्या वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये कितपत निधी ठेवायचा, याबाबत निर्णय घेणे होय. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते अणि तो आपल्या गरजेनुसार असेट अलोकेशन करत असतो.

असेट अलोकेशन करताना प्रत्येक गुंतवणूकदारांनी आपल्या गरजेचा विचार करायला हवा. काही काळानंतर वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या मूल्यांत फरक येतो, तेव्हा असेट अलोकेशनमध्ये आपोआप बदल होतो. या टप्प्यांत संबंधित व्यक्तीने 'री बॅलेन्सिंग' करणे आणि गरजेनुसार असेट अलोकेशन करणे आवश्यक आहे.

उदा. इक्विटी फंडचे प्रमाण पोर्टफोलिओत 60 टक्के ठेवायचे असेल तर तेजीमुळे तो फंड 65 टक्क्यांपर्यंत जाईल. अशावेळी गुंतवणूकदारांना पाच टक्के इक्विटी एक्सपोजर करावे लागेल आणि तो अन्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यायला हवा. जादा परतावा देणार्‍या असेट क्लासमधील हिस्सा काढून घेणे आणि अन्य ठिकाणी गुंतवणूक करत पोर्टफोलिओत काही प्रमाणात समतोल साधला जाईल. (Portfolio Rebalancing)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT