Latest

Pooja Sawant Engagement : पूजा सावंतने केला साखरपुडा, तो मिस्ट्री मॅन कोण आहे?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिने साखरपुडा केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर कपल फोटो शेअर करत ही माहिती दिलीय. (Pooja Sawant Engagement) तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय-Opening my heart to a new chapter with my special one…Here's to the magic of love and to our beautiful journey ahead…We are engaged ♥️Stay tuned with us ? (Pooja Sawant Engagement) आम्ही एंगेज झालो असे तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय. कपल फोटो शेअर करताना तिच्या हातात अंगठी देखील दिसतेय.

संबंधित बातम्या –

पूजा सावंतने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या होणाऱ्या पतीचा चेहरा दिसत नाहीये. तिने फोटो शेअर केल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

तसेच तिचा पार्टनर कोण आहे, त्याचा चेहरा दाखवण्यात यावा, अशी विनंतीही नेटकरी करताना दिसताहेत.

या फोटोमध्ये पूजा आणि तिच्या मिस्ट्री मॅनने पांढेर कपडे परिधान केले आहेत. पूजाच्या हातात साखरपुड्याची रिंग दिसतेय. हिडन फेस फोटो काढल्याने अनेक नेटकऱ्यांना तिचा मिस्ट्री मॅन कोण आहे, असा प्रश्न पडलाय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT