Latest

Daagdi Chaawl 2 : पूजा-अंकूश चौधरीच्या चित्रपटात डेझी शाहचा आयटम सॉन्ग (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दगडी चाळ या सुपरहिट चित्रपटानंतर दगडी चाळ (Daagdi Chaawl 2) या चित्रपटाचा दुसरा भाग भेटीला येत आहे. दगडी चाळ या चित्रपटातील मुख्य कलाकार पूजा सावंत, अंकूश चौधरी हेच दुसऱ्या भागातही असतील. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. पूजा सावंत आणि अंकुश चौधरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटासंदर्भात माहिती दिली. विशेष म्हणजे, या चित्रपटत बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिचे आयटम सॉन्ग पाहायला मिळणार आहे. (Daagdi Chaawl 2)

दगडी चाळ 2 मध्‍ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी पुन्हा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. (Arun Gawli) सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री डेझी शाह हिचे आयटम नंबर पाहायला मिळेल. डेझी शाहने सलमान खानसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं आहे.

डॅडी उर्फ अरुण गवळी आणि अंडरवर्ल्ड या मराठी चित्रपटात पाहायला मिळालं होतं. दगडी चाळ हा चित्रपट चांगला गाजला होता. आता पुन्हा हा चित्रपट धुमाकूळ घालायला येत आहे. प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) आणि अभिनेत्री पूजा सावंत पुन्हा एकत्र या चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे. विशेष म्हणचे खुद्द अरुण गवळीच्या हस्ते दगडी चाळ परिसरात दगडी चाळ २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळचा व्हिडिओदेखील पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये डॅडीच्या हस्ते चित्रपटाचे पोस्टरचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी अंकुश चौधरी आणि अभिनेत्री पूजा सावंत उपस्थित होते.

कोण आहे डेझी शाह?

डेझी शाहने जय हो आणि हेट स्टोरी ३ मध्ये आपल्या अभिनयाने खास ओळख निर्माण केली. आता ही बॉलीवूड अभिनेत्री डेझी शाह मराठी चित्रपट गाणे 'रघु पिंजरियात आला' मध्ये दिसणार आहे. दगडी चाळ २ मध्ये तिचा डान्स असेल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT