Latest

Chhattisgarh Assembly Elections : सुकमामध्ये मतदान केंद्राजवळ पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज (दि.७) मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी मतदान होत आहे. अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत छत्तीसगडमध्ये २२.९७ टक्के मतदान झाले आहे. दरम्याम, सुकमा येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार झाला. त्यामुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. Chhattisgarh Assembly Elections

सुकमा येथील कोंटा पोलीस स्टेशन हद्दीतील बांदा भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. दुरमा आणि सिंगारामच्या जंगलात नक्षलवाद्यांनी बीजीएलवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी गोळीबार करून नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले. नक्षलवादी मतदारांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. घटनास्थळी सीआरपीएफ आणि डीआरजीच्या मोठ्या तुकड्या तैनात आहेत. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. Chhattisgarh Assembly Elections

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT