Latest

P N Patil : २३१ ठरावधारकांच्या शक्तिप्रदर्शनाने आ. पी. एन. पाटील यांचा अर्ज दाखल

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : P N Patil : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत करवीर तालुका विकास सेवा संस्था गटातून आमदार पी. एन. पाटील यांनी शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. फुलेवाडी येथे झालेल्या मेळाव्यात २५१ पैकी २३१ ठरावधारक उपस्थित असल्याचा दावा केला. चार जागा वगळता बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यात कसलीही अडचण नाही, असे आ. पी. एन. पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना आ. पाटील म्हणाले, गेली पस्तीस वर्षे जिल्हा बँकेत गट-तट, पक्ष न पाहता सर्वांना सोबत घेऊन कारभार केला.

पाच वर्षे चेअरमन असताना शेतकर्‍यांना व्याजात दोन टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. जिल्हा बँक जिल्ह्याच्या विकासाची कामधेनू असून भविष्यातही सर्वसामान्यांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे.

P N Patil : समर्थकांची घोषणाबाजी

यावेळी जि. प. अध्यक्ष राहुल पाटील, 'गोकुळ'चे चेअरमन विश्वास पाटील, राजेश पाटील, 'गोकुळ'चे संचालक बाळासाहेब खाडे, बँकेच्या संचालिका उदयानीदेवी साळोखे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

P N Patil : सर्वपक्षीयांशी चर्चा

आ. प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी उमेवारी अर्ज दाखल केला आहे. अद्याप अंतिम चर्चा झालेली नाही. ती लवकरच होईल. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यास अडचण वाटत नाही. सर्व पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. – आ. पी. एन. पाटील

घोषणाबाजी आणि गर्दी

जिल्हा बँकेत अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत उमेदवार समर्थकांसह येत होते.

उमेदवार अर्ज दाखल करून आल्यानंतर समर्थक जोरदार घोषणाबाजी करत होते.

कार्यकर्ते घोषणबाजीमुळे बँक परिसर दणाणून सोडत होते. समर्थकांसह बँकेच्या पायर्‍यावर उभे राहून विजयी चिन्ह दाखवत शक्तिप्रदर्शन केले जात होते.

फेटे आणि टोप्या परिधान करून उमेदवार आणि समर्थक कोल्हापूर जिल्हा बँकेत आल्याने परिसर गर्दीने गजबून गेला होता.

SCROLL FOR NEXT