Latest

Rozgar Mela | पीएम मोदींच्या हस्ते आज ५१ हजार नियुक्तीपत्रांचे वितरण

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सरकारी विभाग तसेच संघटनांमधील नवनियुक्तांना ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण करणार आहेत. रोजगार मेळाव्याअंतर्गत ही नियुक्तीपत्रे वितरीत केली जात आहेत. यावेळी पंतप्रधान या नियुक्त्यांना संबोधित करतील. (Rozgar Mela)

हा रोजगार मेळावा देशभरात ४५ वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि दिल्ली पोलीस यासह विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPF) कर्मचार्‍यांची भरती करणे हा या रोजगार मेळाव्याचा उद्देश आहे. या मेळाव्याचे आयोजन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.

पंतप्रधान मोदी आज सकाळी १०.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवनियुक्तांना ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वाटप करतील.

देशभरातून नवीन भरती झालेले उमेदवार गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), उपनिरीक्षक (जनरल ड्युटी) आणि नॉनजनरल ड्युटी नसलेल्या कॅडेर पदांवर रुजू होणार आहे. (Rozgar Mela)

रोजगार मेळावा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे, असे  सांगण्यात आले आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT