Latest

PM Narendra Modi Nashik Visit : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल 

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (दि.१२) शहरात येत आहेत. या निमित्ताने त्यांचा रोड शो, महोत्सवाचे उद्घाटन, काळाराम मंदिरात दर्शन व गंगाआरती असे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील पंचवटी परिसरातील १८ मार्गांवर वाहतूक बंद करण्याचा निर्णय शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. त्याचप्रमाणे वाहनतळाचेही नियोजन करण्यात आले आहे. (PM Narendra Modi Nashik Visit)

या १८ मार्गांवर राहणार प्रवेश बंद

१) संतोष टी पॉइंट ते स्वामीनारायण चौकीकडे जाणारा मार्ग.

२) तपोवन क्रॉसिंग ते कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीला पूर्णपणे बंदी.

३) स्वामीनारायण चौक ते कार्यक्रमस्थळी जाणारा मार्ग.

४) काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉइंटकडे जाणारा रोड.

५) अमृतधाम चौफुली ते मिर्ची सिग्नलकडे जाणारा रोड.

६) जनार्दन स्वामी आश्रम टी पॉइंट ते तपोवनकडे जाणारा मार्ग.

७) लक्ष्मीनारायण मंदिर ते तपोवनकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीस प्रवेश बंद.

८) निलगिरी बागेतील कॅनॉल चौफुली ते तपोवनकडे जाणारा मार्ग.

९) विडी कामगारनगर पाट चौफुली ते निलगिरी बागेकडे जाणारा रस्ता.

१०) नांदूरनाका ते तपोवनकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांना बंदी.

११) रासबिहारी ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग.

१२) तारवाला चौक ते अमृतधामकडे जाणारा रस्ता.

१३) दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौकाकडे जाणारा रस्ता.

१४) टाकळी गाव ते अनुसयानगर व गोविंद काठे चौकाकडून सिद्धिविनायक चौक व अमृतधामकडे जाणारा रस्ता.

१५) सप्तश्रृंगी माता (सीता गुंफा मंदिर) ते काळराम मंदिराकडे जाणारा रस्ता.

१६) काळाराम मंदिर ते नाग चौक. काट्या मारुती पोलिस चौकीकडे येणारा रस्ता.

१७) सरदार चौक ते काळाराम मंदिराकडे ये-जा करणारा रस्ता.

१८) मालेगाव स्टॅण्ड ते रामकुंड, ढिकले सार्वजनिक वाचनालय, गाडगे महाराज पुलापर्यंतचा रस्ता बंद.

या १३ पर्यायी मार्गांचा करावा वापर

१) सर्व प्रकारची वाहने द्वारका उड्डाणपुलामार्गे इतरत्र ये-जा करतील.

२) अमृतधाम व रासबिहारी यामार्गे इतरत्र ये-जा करतील.

३) पंचवटी कारंजा- मालेगाव स्टँड – रविवार कारंजा, बायजाबाई छावणी व रामवाडी ब्रिजमार्गे इतरत्र ये-जा करतील.

४) अमृतधाम चौफुलीवरून डाव्या बाजूला वळण घेऊन बळी मंदिर उड्डाणपुलावरून इतरत्र ये-जा करतील.

५) मारुती वेफर्सकडून डाव्या बाजूला वळण घेऊन ट्रॅक्टर हाऊस, द्वारकामार्गे इतरत्र ये-जा करतील.

६) नांदूर नाका ते तपोवनकडे जाणारी अवजड वाहतूक शुक्रवारी (दि.१२) सकाळी ६ ते सभा संपेपर्यंत बिटको, नाशिकरोड, जेलरोड- जत्रा चौफुलीमार्गे ये-जा करेल.

७) रासबिहारीकडून येणारी वाहने डाव्या व उजव्या रॅम्पवरून उड्डाणपुलावरून इतरत्र ये-जा करतील.

८) तारवाला चौक ते अमृतधामकडे येणारी वाहतूक वणी, दिंडोरी रोड व पेठ रोडमार्गे इतरत्र ये-जा करतील.

९) दिंडोरी रोड, पेठ रोडमार्गे येणारी वाहने पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड – रविवार कारंजा, बायजाबाई छावणी व रामवाडी ब्रिजमार्गे इतरत्र ये-जा करतील.

१०) टाकळी गाव, अनुसयानगर व गोविंद काठे चौकाकडून येणारी वाहतूक टाकळी रोडने स्वारबाबानगर मार्गे द्वारकाकडे जाईल.

११) सरदार चौक ते काळाराम मंदिराकडे येणारी व जाणारी वाहतूक गणेशवाडी पुलामार्गे (पंचवटी अमरधाम) द्वारका व इतरत्र ये-जा करतील.

१२) मालेगाव स्टँडवरून वाहतूक रविवार कारंजा किंवा मखमलाबाद नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी पुलामार्गे इतरत्र ये-जा करतील.

१३) नाशिकरोडकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक फेम सिग्नल येथून डावीकडे वळण घेत श्री श्री रविशंकर मार्गाने वडाळा गाव, कलानगर, पाथर्डी रोडने पाथर्डी गावामार्गे पुढे मुंबई महामार्गाकडे ये- जा करतील.

वाहनतळाचे नियोजन

सभेच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग

१) वणी-दिंडोरीरोड व पेठरोड बाजूकडून येणारी वाहतूक :

पेठरोड व दिंडोरी रोडने येणारी वाहने व या भागातील नागरिक वाहनाने सभेसाठी येताना आपली वाहने पंचवटीमधील दत्ताजी मोगरे मैदानावर उभी करून शटल बसने सभेच्या ठिकाणी यावे.

२) मुंबई बाजूकडून येणारी वाहतूक :

मुंबई, इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, अंबड, सिडको, जुने नाशिक, काठेगल्ली या भागातून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने ही मुंबई-आग्रा महामार्गाने जुना मुंबईनाका द्वारका सर्कल ट्रॅक्टर हाउस घंटागाडी डेपोजवळ पार्किंग कराव्यात. तेथून शटल बसने सभेच्या ठिकाणी जावे.

३) पुणे बाजूकडून येणारी वाहतूक –

पुणे, अहमदनगर, शिर्डी, संगमनेर, सिन्नर, पळसे, एकलहरे, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, भगूर या भागाकडून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने ही नाशिकरोड रेल्वे पुलाखालून डाव्या बाजूने खाली उतरून बिटको सिग्नल येथून उजव्या बाजूला वळण घेत थेट जेलरोडने दसकमार्गे नांदुरनाका सिग्नल येथून डाव्या बाजूला वळण घेऊन छत्रपती संभाजीनगर रोडने रूद्रा फार्म मैदानावर शरद वाणी यांची खासगी जागेत तसेच गीताई लॉन्स, शहाणे फार्म याठिकाणी पार्क कराव्यात. तेथून सभास्थळी छत्रपती संभाजीनगर रोडने शटल बसने मार्गस्थ व्हावे.

४) छत्रपती संभाजीनगर बाजूकडून येणारी वाहतूक :

येवला, लासलगाव, निफाड, विंचूर, चांदोरी, सायखेडा, चेहडी, ओढा, लाखलगाव, शिलापूरकडून येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने ही छत्रपती संभाजीनगर रोडने लक्ष्मी विजय लॉन्स, राम सीता लॉन्स, यशवंत लॉन्स याठिकाणी पार्क करावे. तेथून शटल बसने सभेच्या ठिकाणी जातील.

५) धुळे बाजूकडून येणारी वाहतूक :

धुळे, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा, पिंपळगाव बसवंत, ओझर या भागातून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने मेडिकल कॉलेज चौफुली मैदानावर पार्क करावीत. तेथून मुंबई- आग्रा सर्व्हिस रोडने शटल बसमधून सभेच्या ठिकाणी जावे.

६) नाशिक शहरातून येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने ही रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, दिंडोरी रोड, पेठ रोड, बायजाबाईची छावणी (गोदापार्क), रामवाडी पूल, चोपडा लॉन्समार्गे येणारी वाहने तपोवन रोडच्या उजव्या बाजूला बटुक हनुमान येथील मोकळ्या जागेत उभी करावी. तेथून शटल बसने सभेच्या ठिकाणी जावे.

वाहतूक मार्ग बदल असा…

मुंबई- आग्रा महामार्गावरून धुळे, मालेगाव या भागातून येणाऱ्या लहान वाहनांना उड्डाणपुलावरून थेट मुंबईकडे जाता येईल.

मुंबई बाजूकडून येणारी लहान वाहने ही धुळ्याकडे जाताना पुलाखालून न जाता द्वारका येथूनच रॅम्पवर चढतील आणि के.के. वाघ कॉलेज येथे रॅम्प उतरून महामार्गाने पुढे धुळ्याकडे जातील.

मुंबईकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने ही पाथर्डीफाटा, पाथर्डी गाव, इंदिरानगर- कलानगर येथून वळण घेत श्री.श्री. रविशंकर मार्गाने वडाळा गावमार्गे पुढे फेम सिग्नलकडे जातील. सिग्नलवरून उजवीकडे वळण घेत पुणे महामार्गाने बिटको पॉइंटमार्गे जेलरोडवरून नांदूरनाका अशी छत्रपती संभाजीनगरकडे जातील.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT