Latest

मोदींच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून भाजपचा सेवा पंधरवडा

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या (१७ सप्टेंबर) वाढदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने उद्यापासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरावडा साजरा करण्याची घोषणा केली आहे. तर, या दिवसाच्या निमित्ताने दिल्लीतील यशोभूमी या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरचे पीएम विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

भाजपने मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर केलेल्या सेवा पंधरवड्यांतर्गत २४ सप्टेंबरपर्यंत देशभरात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यात सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे घेतली जाणार आहेत. यासोबतच, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे देखील होणार आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत दिल्या जाणारे ई कार्ड या पंधरवड्यात अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. तर दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीदिनी देशभरात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे.

यशोभूमीचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

दिल्लीतल्या द्वारका भागात उभारलेल्या 'यशोभूमी' हे जागतिक दर्जाच्या प्रदर्शन केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. ५४०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या प्रदर्शन केंद्राचे एकूण क्षेत्रफळ ८.९ लाख चौरस मीटर आहे. या केंद्रामध्ये मुख्य सभागृह, भव्य बॉलरूम आणि १३ बैठक दालने, तर १५ अधिवेशन खोल्या आहेत. एकाचवेळी ११ हजार प्रतिनिधी सामावून घेण्याची त्यांची क्षमता असून भव्य मुख्य सभागृहाची आसनक्षमता ६००० एवढी आहे. येथे असलेल्या आकर्षक ग्रॅन्ड बॉलरुममध्ये एकाचवेळी २५०० पाहुणांचे आदरातिथ्य केले जाऊ शकते.

पीएम विश्वकर्मा योजनेला प्रारंभ

दरम्यान, यशोभूमीच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम विश्वकर्मा योजनेला प्रारंभ करतील. परंपरागत व्यवसायातील कारागिरांना पाठिंबा देणे आणि त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणलेल्या या योजनेसाठी १८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमध्ये अठरा हस्तकलांचा समावेश असेल. या योजनेमध्ये कारागिरांना कौशल्य विकासासाठी कर्जसहाय्य आणि प्रशिक्षण दिले जाईल. यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाणार आहे.

-हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT