कोल्हापूर : दानोळीत आढळला म्हामुळ जातीचा साप | पुढारी

कोल्हापूर : दानोळीत आढळला म्हामुळ जातीचा साप

दानोळी; पुढारी वृत्तसेवा : दानोळीतील नदाफ पिंजारी मळा परिसरात म्हामुळ जातीचा साप आढळून आला. जाळीत अडकलेल्या सापाला काही तरुणांनी सुरक्षितपणे बाहेर काढून वन्यजीव बचाव टीमच्या हवाली केले.

दानोळीतील पिंजारी मळा परिसरात सूरज नदाफ यांच्या शेतात कुंपणाच्या जाळीत अडकलेला म्हामुळ (म्हामडुळ) जातीचा साप अडकला होता. हे लक्षात येताच त्यांनी सर्पमित्र रियाज नदाफ- मिस्त्री यांना याची माहिती दिली. तेव्हा रियाज नदाफ यांनी जाळीत अडकलेला तो साप सुरक्षित बाहेर काढला. त्यामुळें जाळीत पूर्णपणे गुरफटलेल्या सापाचे प्राण वाचले. या कामी सर्पमित्र रियाज नदाफ यांना सूरज नदाफ, उमेश चव्हाण, सोफीयान वडगावे यांनी सहकार्य केले. दरम्यान जाळीत पूर्णपणे अडकलेल्या सापाला कोणतीही दुखापत होउ नये याची काळजी घेण्यात आली.

सापाला जाळीतून मोकळे करून सुरक्षित रित्या वण्यजीव बचाव टीम चे प्रदीप सुतार यांच्या ताब्यात देण्यात आले. युवकांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Back to top button