Latest

Goa Rozgar Mela | मोपा विमानतळामुळे गोव्यात रोजगार निर्मितीस मदत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

दीपक दि. भांदिगरे

पणजी; पुढारी ऑनलाईन : गेल्या ८ वर्षात केंद्र सरकारने गोव्याच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या मोपा विमानतळाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. या विमानतळाच्या उभारणीमुळे गोव्यात रोजगार निर्मिती होण्यास मदत होत आहे. त्याचप्रमाणे गोव्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प गोव्यातील तरुणांसाठी रोजगार निर्माण करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

गोवा सरकारने राजभवनमधील दरबार हॉल येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात (Goa Rozgar Mela) आज गुरुवारी (दि.२४) विविध सरकारी खात्यांत नियुक्त झालेल्यांना नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

गोवा सरकारने विविध विभागांमधील नोकर भरतीसाठी एक आवश्यक पाऊल उचलले आहे. आज मोठ्या संख्येने नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. गोवा पोलिसांसह इतर अनेक विभागांत येत्या काही महिन्यांत रिक्त जागांसाठी भरती होईल. त्यामुळे गोवा पोलिसांना बळ मिळेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

गोव्यात भात, नारळ आणि अन्य पिकांची शेती करणाऱ्यांना सेल्फ हेल्फ ग्रुपशी जोडले जात आहे. यामुळे गोव्यातील शेतकऱ्यांना बळ मिळत आहे. तसेच गोव्यात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ज्या ज्या राज्यांत भाजपचे डबल इंजिन सरकार आहे तिथली राज्य सरकारे रोजगार मेळाव्याचे आयोजन करत असून त्याबद्दल आपल्याला आंनद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Goa Rozgar Mela)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT