Latest

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक , केंद्राने मागविला पंजाब सरकारकडून अहवाल

नंदू लटके

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक झाल्या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात उशीर होत असल्याचे सांगत केंद्र सरकारने यासंदर्भात पंजाब सरकारकडून अहवाल मागविला आहे. गतवर्षीच्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेतील त्रुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी पाच सदस्यांची समिती स्थापन केली होती. माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने सहा महिन्यांपूर्वी आपला अहवाल सादर केला होता.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक होण्यास राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी, पोलीस प्रमुख एस. चट्टोपाध्याय तसेच इतर काही अधिकारी जबाबदार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. ज्यावेळी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली होती, त्यावेळी राज्यात काँग्रेसचे चरणजीतसिंह चन्नी यांचे सरकार सत्तेत होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT