Latest

Pm Modi America Visit : संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ह्युस्टन विद्यापीठात ‘तमिळ चेअर’ची स्थापना; PM मोदींची घोषणा

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. दरम्यान, शुक्रवारी (दि.२३) त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले. अमेरिकेत मला मिळालेले प्रेम अप्रतिम असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ह्युस्टन विद्यापीठात तमिळ चेअर स्थापन करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की ह्यूस्टन विद्यापीठात तमिळ स्टडीज चेअरच्या स्थापनेमुळे तमिळ संस्कृतीचा आणि जगातील सर्वात जुन्या तमिळ भाषेचा प्रभाव वाढण्यास मदत होईल. वाचा सविस्तर बातमी. (Pm Modi America Visit )

Pm Modi America Visit : संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांचा अमेरिका दौऱ्यावर होते. या दरम्यान पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसमध्ये परेड देण्यात आली. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी जिल बायडेन यांच्यासोबत खासगी डिनरही केले. नंतर, पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ राज्य डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या डिनर कार्यक्रमात जगातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर त्यांनी  शुक्रवारी (दि.२३) अमेरिकेतील भारतीय समुदायासमोर ह्युस्टन विद्यापीठात भारत सरकारच्या मदतीने तमिळ अभ्यासाचे अध्यक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे तमिळ संस्कृतीचा आणि जगातील सर्वात जुन्या तमिळ भाषेचा प्रभाव वाढण्यास मदत होईल. यासोबतच भारताच्या इतिहास आणि संस्कृतीचे संशोधन आणि अध्यापन पुढे नेण्यासाठी ते शिकागो विद्यापीठात विवेकानंद चेअरची पुनर्स्थापना करतील असेही म्हणाले.

अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी विविध कार्यक्रमात सहभागी झाले. अमेरिका दौऱ्यानंतर ते आज (दि.२४) इजिप्तला रवाना झाले आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT