Latest

संसद सुरक्षा भंग प्रकरण दुर्दैवी आणि चिंताजनक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संसदेच्‍या सुरक्षा भंग प्रकरणाची  घटना दुर्दैवी आणि चिंताजनक असल्‍याचे स्‍पष्‍ट करत लोकसभेचे अध्‍यक्ष ओम बिर्ला अत्‍यंत गाभीर्याने या प्रकरणी आवश्‍यक पावले उचलत आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल घेण्‍यात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्‍हटलं आहे. (Parliament security breach)

अशा विषयांवर वादविवाद करण्यापासून दूर राहावे

दैनिक जागरणच्‍या लेखामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा हवाला देत नमूद करण्‍यात आले आहे की, संसदेत घडलेल्‍या प्रकारचे गांभीर्याने दखल घेण्‍यात आली आहे. लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला या प्रकरणी गांभीर्याने आवश्यक पावले उचलत आहेत. या संपूर्ण प्रकारामागील कोण होते. त्‍यांचा मनसुबा कोणता होता, हे समजून घेणे आणि त्‍यावर उपचार शोधणे तितकेच महत्त्‍वाचे आहे. मोकळ्या मनाने उपाय शोधले पाहिजेत. प्रत्येकाने अशा विषयांवर वादविवाद करण्यापासून दूर राहावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले आहे. (Parliament security breach)

संसदेच्‍या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, १३ डिसेंबर रोजी सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोन तरुणांनी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारली होती. संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 22 वा स्मृती दिना दिवशी झालेल्‍या धक्‍कादायक प्रकाराने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्याने देशभरात एकच खळबळ माजली आहे. याच वेळी अमोल शिंदे आणि नीलम देवी या दोघांनीसंसदेच्या आवाराबाहेर "तानाशाही नही चलेगी" अशी घोषणा देत डब्यातून रंगीत धूर सोडला. पाचवा आरोपी ललित झा याने कथितरित्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.
ललित झा याला पसार होण्‍यास मदत करणारा सहावा आरोपी महेश कुमावत याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. कट रचण्यासाठी तो गेल्या दोन वर्षांपासून अन्य आरोपींच्या संपर्कात असल्‍याचे प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT